खडसेंना बालेकिल्ल्यातच धक्का : समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

ऑक्टोबर 28, 2022 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर मतदारसंघातील माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

khade anda gulabrao patil

जळगावातील विश्रामगृहावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते बाळासाहेबांची शिवसेना व बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारसंघातील खडसे समर्थक तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, रेंभोटा येथील छोटू पाटील, वाघाडीचे भैय्या पाटील, भूषण पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, नगरसेवक आरीफ आझाद, पियुष मोरे, मुकेश वानखेडे उपस्थित होते.

या पक्षांतरावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना डिवचले. “त्यांना धक्के तर कायमच चालले आहेत, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोण्याचे धक्के, दुधाचे धक्के, तुपाचे धक्के व आता हे माणसांचे धक्के” अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. लवकरच मुक्ताईनगर येथे संपर्क यात्रा होणार असून यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीचे जिल्हा सोशल मेडिया सेलप्रमुख माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, , निंभोरा स्टेशन राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील, निंभोरा स्टेशनचे उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर (धामोडी) यांनी कार्यकर्त्यांसाहित शिवसेनेत प्रवेश केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now