जळगाव शहर
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फाडले पठाणचे पोस्टर
जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2023। बजरंग दलाच्या वतीने पाचोऱ्यातील देशमुखवाडी भागात पठाण चित्रपटाविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी प्रकाश चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाविरोधात घोषणाबाजी केली. याच बरोबर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर लावलेले पठाणचे पोस्टर फाडले.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे सचिन येवले, अभिषेक पाटील, अभिषेक नाथ, गौरव राजपूत, बंटी भोई, चेतन भोई, गोलू महाजन, प्रशांत सोनार, गोपाल सोनार, सागर भोई, पप्पू पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी थिएटर बाहेर घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. बाहेर लावलेले पोस्टर फाडले व प्रकाश थिएटरचे मालक मनीष काबरा यांना चित्रपट न दाखविण्याचे व चित्रपट कोणीही न पाहण्याचे आवाहन केले.