जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । लोहारा ( ता.पाचोरा ) येथे कत्तलीसाठी टेम्पाेतून नेण्यात येणाऱ्या सहा गुरांचे प्राण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे वाचले. दरम्यान, गुरांची सुटका करून वरखेडी येथील महावीर गाे शाळेत रवाना करण्यात आले असून, अंदाजित ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पाेलिसात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर असे की, लाेहारा गावाबाहेर रस्त्यालगत ४०७ टेम्पो उभा होता. त्यातून अमानुषपणे बांधून गुरांची वाहतूक होताना बजरंग दलाचे संयोजक महेंद्र घोंगडे व आप्पा चौधरी यांना दिसले. दरम्यान,गुरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आल्याने बजरंग दल कार्यकर्त्यांनी वाहन चालक ( मुजाहिद रफीक शेख,रा.मुल्लावाडा, पाचोरा ) व (आबिद खान अकमल खान,रा. इस्लामपूर,चाळीसगाव ) यांना विचारपूस केली. त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने शंका बळावली. महेंद्र घोंगडे यांनी लोहारा येथील हेमंत गणेश गुरव यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी गाडी लोहारा दूर क्षेत्र पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. हेमंत गुरव यांनी तत्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, चाळीसगाव विभागाचे पाेलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्याशी संपर्क करून याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार गुरांची गाडी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात आणली. तेथे गाडी व गुरांचा पंचनामा करून जप्त केले.
वाहनाची अंदाजित रक्कम २ लाख ७५ हजार व ९२ हजार रुपये किमतीची गुरे असा एकूण ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. सुटका झालेली सहा गुरे वरखेडी येथील महावीर गाे शाळेत रवाना केले. पोलिस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलिस नाईक अरुण राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तपास पोलिस हवालदार अरविंद मोरे करत आहेत.
हे देखील वाचा :
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार
- जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार