⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

संजय राऊत यांना जामीन : जळगावात शिवसेनेचा आनंदोत्सव

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेनेतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या 17 मजली इमारती समोर हा जल्लोष करण्यात आला. यावेळी , जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपूरे, नगरसेविका ज्योती तायडे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई ( येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाकडून जामीन मिळावा; यासाठी संजय राऊत यांनी अनेक वेळा अर्ज केला होता. परंतु त्यांचा जामीन नाकारण्यात येत होता. मात्र आज राऊत यांच्या जामीनावर न्यायालयात कामकाज झाले असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

=संजय राऊत यांना जामीर मिळाल्‍यानंतर जळगाव महापालिकेच्या समोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फटाके फोडले. तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फूगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपूरे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.