इंधन दरवाढ विरोधात बहुजन मुक्ति पार्टीतर्फे धक्का मारो आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या असून या महागाईविरोधात आज मंगळवारी दुपारी बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, मोटारसायकल, रिक्षा व चार चाकी वाहनांना ढकलून धक्का मारो आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
काय म्हटले आहे निवेदनात?
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती प्रचंड वाढविल्या आहे. राज्य सरकारने वाढविलेल्या वीजबील व खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्व सामन्य नागरीकांचे जीवन होरपळून निघाले आहे. लॉकडाऊन काळात सामान्य नागरीकांचे उत्पन्न कमी झाले आहे. याला केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार आहे. त्वरील वाढविलेले दर कमी करावे या मागणीसाठी आज मंगळवारी स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी, मोटारसायकल, रिक्षा व चार चाकी वाहनांना ढकलून धक्का मारो आंदोलन करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीचे हारून मन्सुरी, जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, जिल्हा कार्याध्यक्षक अलीम शेख, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, सुनिता पवार, महिला आघाडीच्या संध्या कोचूरे यांच्या नेतृत्वाखाली धक्का मारो आंदोलन करण्यत आले. आंदोलन यशस्वितेसाठी विनोद अडकमोल, रवींद्र वाडे, प्रमोद सैदाणे पाटील, सुनील शिंदे पाटील, अजय इंगळे, इरफान शेख, रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रहीम तांबोळी, सुभाष सुरवाडे, विजय साळवे, संगीता देहाडे, अनिता पांढरकर, राजश्री अहिरे यांनी कामकाज पहिले.