बहिणाबाई महोत्सवात ७ दिवस होणार लोककलेचा जागर, १८ ते २४ दरम्यान आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । खान्देशाचा सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२२ या सातव्या वर्षाचे आयोजन दि. १८ ते २४ एप्रिल रोजी बॅरिस्टर निकम चौक सागर पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना महामारी च्या प्रलय यामुळे मागील वर्षीचा महोत्सव कोरोना निर्बंधांमुळे रद्द करण्यात आला होता. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या महोत्सवाचे आयोजन होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या वर्षीचा महोत्सव सात दिवस राहणार आहे. खान्देशातील विविध लोककला यांच्या सादरीकरणासह देश भक्तीचा जागर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना योग्य ती किंमत मिळावी व त्यातून महिलांचा आर्थिक उन्नती व विकास व्हावा हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून भरारी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षीच्या महोत्सवाचे ७ वे वर्ष असून हा महोत्सव दिनांक १८ एप्रिल ते २४ एप्रिल असा सात दिवस होणार आहे
महोत्सवाच्या आयोजनाची तयारीला प्रारंभ झाला असून महिला बचत गटांचा उस्फूर्त प्रतिसाद या महोत्सवात मिळत आहे प्राधान्यक्रमाने महिला बचत गटांना या महोत्सवात त्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करण्यात येत असून दिनांक १० एप्रिल पर्यंत हे बुकिंग सुरू असणार आहे. तरी महिला बचत गटाने या संधीचा लाभ घ्यावा व यासाठी असे आवाहन भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी विनोद ढगे सचिन महाजन यांनी केले आहे.