⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी : मिळतोय फक्त ‘इतका’ भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।१० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना आवश्यकता असतानाच वेळेवर पाऊस झाला. अशावेळी पीक खूप चांगली आली. मात्र याचा फटका सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना झाला असून सोयाबीनला केवळ सहा हजार भाव मिळत असल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे व शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे सोयाबीनची शेती बहरू लागली आहे. शेती बहरल्यामुळे यंदा पीक चांगल आलं आहे. असे शेतकऱ्यांना वाटत आहे व यंदा चांगला व्यवसाय होईल असा अंदाज शेतकऱ्यांचा होता. मात्र सोयाबीनला केवळ साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

जेव्हा शेतकऱ्यांकडे माल असतो तेव्हा सोयाबीनचे दर हे वाढत असतात मात्र शेतकऱ्यांकडे माल आला की लगेच भावामध्ये घट होते. गेल्या वर्षी देखील हीच परिस्थिती होती. दरम्यान सध्या तरी सोयाबीनच्या दरात कमी प्रमाणात घट झाली असली तरी मात्र नोव्हेंबर नंतर दरात वाढ होण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये सोयाबीनला 11000 रुपये पर्यंत भाव मिळत होता. गेल्या तीन वर्षापासून अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बाजारात सोयाबीनची मागणी होती. यंदा सोयाबीन जरी भरला असला तरी सोयाबीनची मागणी घटली आहे. कारण सगळीकडे सोयाबीन चांगला आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणे कठीण झाले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी तब्बल 21 हजार हेक्टर इतकी सोयाबीनची लागवड करतात. त्यामुळे यंदा मालही चांगला आल्याने शेतकऱ्यांना अशा होती की चांगले पैसे मिळतील. मात्र असे काहीही झाले नाही.