दुर्वैवी ! शेतातील पत्री शेडला आग लागल्याने दोन बैल व एक गाय भाजली

fire

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । उत्राण म्हसावद रस्त्यावर असलेल्या अरुण नामदेव पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात 30 बाय 32 चे पत्री शेड असून त्यात चारा भरला होता. शेडला लागून गुरे बांधली होती.बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक गाय चाळीस टक्के भाजली तर दोन बैल पंधरा टक्के भाजले.

यावेळी चारा जळाल्याने मोठे नुकसान झाले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला दरम्यान एरंडोल नगरपालिकेची अग्निशमन गाडी व कर्मचाऱ्यांनी आगीवर तात्काळ नियंत्रण केले.

या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now