बाबा महाहंस महाराज कोठडीतच : जामीन फेटाळला
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । आडगाव (ता.यावल) येथील बाबा महाहंस हे सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत.त्यांची खोटे दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.सोमवारी येथील न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला मात्र, यावल न्यायालयाने तो फेटाळला.
श्री.क्षेत्र आई मनुदेवी मंदिराची जागेची आडगाव ग्रामपंचायतीच्या नमुना 8 मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंद करणे व नंतर त्या उतार्यावर चॅरिटेबल ट्रस्ट उघडून फसवणुक करणक बाबत सातपुडा निवासनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक 2 डिसेंबर रोजी आडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मार्तड पाटील उर्फ बाबा महाहंसजी महाराज यांच्या विरूध्द गुन्हा दाखल आहे. महाहंस महाराजांना गुन्हा दाखल केल्यानंतर 3 रोजी अटक करण्यात आली होती.दरम्यान,भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात बाबांना जामिन मिळण्यासाठी अर्ज करण्यात येईल,असे बाबांच्या अनुयायींनी सांगितले.