⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

निसर्गोपचार केंद्र हा भविष्यातील महत्त्वाचा ड्रीम प्रोजेक्ट ठरणार – डॉ. एन.एस. चव्हाण

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । पर्यावरणाचा ऱ्हास आणि रसायनांचा वाढता वापर यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत असल्याने सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टने निर्माण केलेले निसर्गोपचार व पंचकर्म केंद्र हा भविष्यातील महत्त्वाचा ड्रीम प्रोजेक्ट ठरणार आहे,  असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सावदा प्र. वढोदे ( ता. रावेर ) येथे निर्माण केलेले निसर्गोपचार व पंचकर्म केंद्रात केले.

यांची उपस्थिती होती 

खानदेशात प्रथमच निर्माण होत असलेल्या सावदा प्र. वढोदे येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, त्यांच्या पत्नी उषाताई चव्हाण, गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट जामनेरचे अध्यक्ष श्याम चैतन्य महाराज यांनी भेट दिली. यावेळी श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, प्रा. उमाकांत पाटील उपस्थित होते.

दरम्यान, महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पंचकर्म व निसर्गोपचार केंद्रासंदर्भात त्यांना विस्तृत माहिती दिली.  निसर्गाच्या सानिध्यात, औषधीयुक्त नैसर्गिक वनस्पती, गौ शाळा व शुद्ध ऑक्सीजन, सर्व सोईयुक्त विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असलेले हे निसर्गोपचार केंद्र सर्वांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी पाहणी करतांना सांगितले. तत्पूर्वी त्यांनी  सतपंथ मंदिरात दर्शन घेतले. व सपत्नीक महाराजांचे आशिर्वाद घेतले.