बाबा महाहंस महाराजला ३५ दिवसांनंतर जामीन
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । आडगाव ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले येथील बाबा महाहंस महाराजांना अखेर ३५ दिवसांच्या तुरूंगवासातून जामीन मिळाला. यानंतर ते आश्रमात परतले आहेत.
श्री क्षेत्र मनु देवी मंदिराच्या जागेची आडगाव ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंद करणे, नंतर त्या उताऱ्यावर चॅरिटेबल ट्रस्ट उघडून फसवणूक केल्याप्रकरणी सातपुडा निवासिनी मनु देवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २ डिसेंबरला आडगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मार्तंड पाटील उर्फ बाबा महाहंस महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यांना ३ डिसेंबर २०२१ रोजी यावल न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले होते. या गुन्ह्यात महाराजांना प्रथम ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. नंतर ते न्यायालयीन कोठडीत भुसावळच्या दुय्यम कारागृहात होते. शुक्रवारी त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मिळाला. ते आश्रमात परतले आहेत.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन