बाप रे..कौटुंबिक वादातून पत्नीला दमदाटी मग तीक्ष्ण हत्याराने वार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । कौटुंबिक वादातून माहेरी राहत असलेल्या पत्नीवर चक्क तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याचे प्रकार समोर आलाय. ही घटना यावल तालुक्यातील अट्रावल येथे मध्यरात्री घडली. याबाबत विवाहितेच्या तक्रारी वरून पतीसह त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 22T163317.097

अट्रावल येथील माहेर असलेल्या योगिता खुशाल बोरसे यांचा विवाह भुसावळ येथील खुषाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे यांच्याशी झालेला आहे. दरम्यान त्यांचा कौटुंबिक वाद असल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून योगिता ह्या अट्रावल येथे आई-वडिलांकडे राहतात. या काळामध्ये खुशाल बोरसे याने पत्नी योगीताशी वेळोवेळी फोनवर संपर्क साधून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. दरम्यान, मंगळवार २१ जून रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास खुषाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे आणि त्याचा मित्र अरविंद कांबळे हे दोघेजण घरी येऊन योगिता बोरसे हिला धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.

दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी योगिताचे वडील अर्जुन सुरेश भिल आणि आई यांनी धाव घेतली असता त्यांना देखील दुखापत केली आहे. याबाबत अर्जुन सुरेश भिल यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे आणि अरविंद कांबळे दोन्ही राहणार भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विनोद खांडबहाले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now