⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

‘आझादी का अमृत महोत्सव’ : बोदवडला ध्वजारोहणावरून शिंदे गटाकडून ठिय्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन ‘आझादी का अमृत महोत्सव’ सोमवारी उत्साहात साजरा झाला. बोदवड शहारत देखील ‘हा’ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, आमदारांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शंभर फुटी ध्वजारोहण आ.एकनाथराव खडसे यांनी केले, हा मान संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष डॉ. उद्धव पाटील यांच्या हस्ते होणार होते, असा आरोप शिंदे गटातील आमदाराच्या समर्थकांकडून करण्यात आला तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संबंधितांवर योग्य तपास करून कारवाई दाखल करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार श्वेता संचेती यांनी दिल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.

बोदवड शहरातील तहसील कार्यालयात सकाळी गांधी चौकात ध्वजारोहण करून नगराध्यक्ष, नगरसेवक, राजकीय, सामाजिक, पदाधिकारी, कार्यकतें तहसील कार्यालयात येत असतात. येथील शासकीय ध्वजारोहण ९ वाजून ५ मिनिटांनी प्रभारी नियुक्त तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी केले. आ. चंद्रकांत पाटील यांच्या स्थानिक निधीमधून उभारण्यात आलेल्या शंभर फुटी ध्वजारोहण ९ वाजून ३५ मिनिटांनी होणार होते मात्र, आ.एकनाथराव खडसे यांनी ९ वाजून वीस मिनिटांनी केले. की, जो मान संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष डॉ. उद्धव पाटील यांच्या हस्ते होणार होते असा आरोप शिंदे गटातील आमदाराच्या समर्थकांनी केला.

त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये ज्या विविध स्पर्धा शाळा मार्फत घेण्यात आल्या, त्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, नगराध्यक्ष आनंदा पाटील यांना मान न मिळाल्यामुळे शिंदे शिवसेना समर्थक यांनी तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या दालनात अर्ध नग्न ठिय्या आंदोलन नगरसेविका पती गोलु बरडिया यांनी सुरू केले, त्याच्या सोबतच त्याला पाठिंबा नगरसेवक हाजी सईद बागवान स्वीकृत नगरसेवक राजेश नानवानी नगराध्यक्ष आनंदा पाटील संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष डॉ. उध्दव पाटील, नगरसेविका पति सुनिल बोरसे, नगरसेविका पुत्र हर्षल बडगुजर समन्वय समिती अध्यक्ष विरेद्रसिंग पाटील केले,

दरम्यान, जोरदार घोषणा देत तहसीलदार यांना जाव जाब विचारत झेंडावंदन चा ९: ३५ ची वेळ असताना नऊ विसला का करण्यात आले व नगराध्यक्षांना जी प्रथम नागरिक असताना गुणवंत विद्याथ्यांच्या कार्यक्रमाला का बोलवले नाही, आंदोलन स्थानिक नगरसेवक शिवसेना पदाधिकारी यांनी ठोस भूमिका घेतली, संबंधित जोपर्यंत अधिकार गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही असे ठिय्या आंदोलन सुरू असतांना तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी हतबल झाले होते ही परिस्थिती जितेंद्र कुवर यांनी सांगितले माझ्याकडे स्थानिक तहसीलदार पदभार नाही माझी फक्त शासकीय ध्वजारोहण साठी नियुक्ती केली या तहसील चा अतिरिक्त पदभार मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडे आहे मी फक्त ध्वजारोहण साठी आलेलो आहे असे सांगितले यावर कार्यकर्ते अजूनही आक्रमक झाले.

यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला त्यांनीही अधिकाऱ्याला चागले फटकारले ९:३५ टाईम असताना ९:२० ला कसे झाले यावर प्रश्नावर सर्व कर्मचारी तणावग्रस्त ग्रस्त आणि सर्वांची चेहरे हतबल झाले होते यामुळे प्रभारी तहसीलदार म्हणून श्वेता संचेती ह्या बोदवड येथे आल्यावर त्यांनी सांगितले जे कोणी संबंधित दोषी असतील चौकशी करून संबंधितांवर योग्य तपास करून कारवाई दाखल करण्यात येईल वानंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलन मागे घेण्यात आले.