⁠ 
सोमवार, मे 6, 2024

आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळा तर्फे पूरग्रस्तांना मदत

जळगाव लाईव्ह न्युज | ७ सप्टेंबर २०२१ | गेल्या आठवड्यात चाळीसगावात झालेल्या अतिवृष्टीमुळे, तालुक्याने मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती अनुभवली होती. दरम्यान  अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते. अश्या पुरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात म्हणुन आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने या वर्षी “गणेश उत्सव पुरग्रस्तांन सोबत” हा उपक्रम राबविला. या उपक्रमा अंतर्गत चाळीसगाव तसेच त्या भागातील ज्या ग्रामीण भागात पुराचा फटका बसला आहे अशा पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत, आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने १३० शिधा पाकिटांचा वाटप केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष अश्विन भोळे, राहुल घोरपडे, विपिन पाटील, रुपेश पाटील, विपिन पवार, महेश पाटील, राज चंदनकर, निर्भय पाटील, निरज महाजन, शाहरुख कुरेशी, गौरव चंदनकर, अजिंक्य शेळके, यश चंदनकर, हिमांशु चंदनकर, नितीन चंदनकर, अजिंक्य शेळके, यश शेकळे, सुमीत जगताप, प्रणय पाटील, मयुर रत्वेकर, रुपेश भाकरे, हितेश भाकरे, फरदिन कुरेशी, रोहीत कुमावत, अभिषेक कुलकर्णी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.