जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जानेवारी 2024 । अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असून रामलला यांची पहिली झलक समोर आली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज दुपारी 12.29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यांच्यासोबत संघप्रमुख मोहन भागवतही होते. यावेळी राम मंदिराचे प्रांगण भजनाने दुमदुमले.
त्यानंतर पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली. देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांच्या कृत कृत्य झाल्याच्या भावना झाल्या.