⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जागृती‎ फिरकेचे एमबीबीएस‎ परीक्षेत यश

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । यावल तालुक्यातील‎ न्हावी येथील रहिवासी‎ जागृती धनंजय‎ फिरके हीने‎ एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली.‎ तीने डॉ.व्ही.एम.वैद्यकीय‎ महाविद्यालय सोलापूर येथून‎ एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

तिला‎ अंकुर चितोरा, अमोल मोरे, अभिश्री‎ कोल्हे, शबनम भाटी यांच्यासह‎ गुरुजनांचे मार्गदर्शन मिळाले. ती‎ जळगावच्या शकुंतला‎ जे.विद्यालयातील उपशिक्षक‎ धनंजय फिरके व शा.ल.खडके‎ प्राथमिक विद्या मंदिर जळगाव‎ येथील शिक्षिका स्वाती फिरके यांची‎ सुकन्या आहे. जागृतीच्या या‎ यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाने‎ तिचे कौतुक केले.‎