⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | बोदवड महाविद्यालयाच्या वतीने योगाविषयी जनजागृती

बोदवड महाविद्यालयाच्या वतीने योगाविषयी जनजागृती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विशाल तांगडे । बोदवड येथील महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योगा दिनाचे औचित साधून शनिवारी दि. ३०एप्रिल रोजी योगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व स्वयसेवकांनी योगा बद्दल जनजागृतीपर घोषणा दिल्या.

सुरुवातीला महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल बारी यांनी उपस्थितांना उद्बोधन करताना योगाची महत्त्व समजवून सांगितले. यासोबतच २१जून पर्यंत जे १०० दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस २०२२साठी रासेयो अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामध्ये महाविद्यालय परिसराच्या बाहेर लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी योगा जनजागृती रॅली खूप महत्त्वाचे आहे असे महत्व पटवून दिले. याप्रसंगी उपस्थित रासेयो स्वयंसेविका जयश्री माळी व भाग्याता पाटील हिने ग्रामस्थांना आपल्या मनोगतातून योगाचे महत्व सांगितले. त्यानंतर सर्व रासेयो स्वयंसेवक उपस्थित ग्रामस्थ यांनी योग दिनाच्या निमित्ताने योगाची सार्वजनीक शपथ घेतली. याप्रसंगी उपस्थित रासेयो स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना आपल्या मनोगतात मधून योगाचे महत्व सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही पी. चौधरी, डॉ. ईश्वर म्हसलेकर महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वंदना बडगुजर,  दिपाली तायडे, निवृत्ती चौधरी, संभाजी टिकारे, भाग्यश्री बिल्लोलरे, आरती माळी, हृषिकेश चौधरी, संजय डांगे,रोशन शेडके, स्नेहा माळी, पूजा जाधव, मोहन ताठे, मोहिनी पाटील, शुभांगी राउत, सुजाता इंगळे, निखील गावंडे, नेहा आहुजा, जयश्री माळी व अपूर्वा वंजारी इतर स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. 

योगाचे महत्व सर्वसामन्यांपर्यंत पोहचवावे त्यासाठी  सदर रॅलीचे आयोजन केल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे राष्ट्रीय सेवा योजनचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, राष्ट्रीय सेवा योजनचे जळगाव जिल्हा समन्वयकडॉ. मनिष करंजे, संस्थेचे अध्यक्ष मिठूलालजी अग्रवाल, उप-अध्यक्ष अजयजी जैन, सचिव विकासजी कोटेचा, जेष्ठ संचालक ऍड. प्रकाशचंद सुराणा, यांनी कौतुक केले .
 

author avatar
टीम जळगाव लाईव्ह