⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

प्रा.पवार यांना पीएच.डी.पदवी प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. डी, पवार यांनी रसायनशास्त्र विषयात ‘मॉली कुलर इंटरॅक्शन्स स्टडीज बाय मेजरमेंट ऑफ व्हिस्कॉसिटी, डॆंसिटी ॲड अल्ट्रासोनिक व्हेलोसिटी ऑफ लिक्विड मिक्स्चर’ या विषयात संशोधनास केले होते. त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. आर. डी. पवार यांना भुसावळ येथील डी. डी. एन. भोळे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे (मार्गदर्शक) व चोपडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. आर. पाटील (सह-मार्गदर्शक) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी रसायनशास्त्र विषयात ‘मॉली कुलर इंटरॅक्शन्स स्टडीज बाय मेजरमेंट ऑफ व्हिस्कॉसिटी, डॆंसिटी ॲड अल्ट्रासोनिक व्हेलोसिटी ऑफ लिक्विड मिक्स्चर’ या विषयात केलेल्या संशोधनास पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, अध्यक्ष गोकुळ पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, संचालक महेंद्र भोईटे, प्रमोद काळे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील उपप्राचार्य प्रा. संजय पाटील प्रा. मुकेश येवले सर आदी तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.आर डी पवार यांचे अभिनंदन केले.