ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवाआधीच ऑगस्टचा पगार याच जमा होणार?

ऑगस्ट 22, 2025 2:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपतीआधीच मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत.

bus ganpati bappa

मिळालेल्या माहितीनुसार, सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. चार ते पाच दिवस आधीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होऊ शकतो, असे सांगितले जातेय.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळण्यात अडथळे येत होते. त्यामुळे त्यांच्यात असंतोष वाढत होता. विशेषतः सणासुदीच्या काळात खर्च वाढल्याने कर्मचारी सातत्याने वेळेवर पगाराची मागणी करत आहेत. यावर उपाय म्हणून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणपती सणापूर्वीच पुढील महिन्याचा पगार देण्याचे निर्देश दिले आहेत

परिवहन मंत्रालयाने सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now