अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

मार्च 5, 2026 5:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीत जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय इमारत आवार, आकाशवाणी चौक, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहेत. या वाहनांपैकी अनेक वाहनमालकांनी शासकीय दंडाची रक्कम तहसील कार्यालयात भरणा केलेली नसल्याने अशा वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

valu mafiya jpg webp

त्याअनुषंगाने एकूण 34 वाहनांचा जाहीर लिलाव 12 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे जाहीर बोली पद्धतीने करण्यात येणार आहे.

लिलावासाठी असलेल्या वाहनांची सविस्तर माहिती, हातची किंमत, दंडाची रक्कम तसेच लिलावाच्या सर्व अटी व शर्ती तहसील कार्यालय, जळगाव येथील नोटीस बोर्डावर तसेच http://www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, जळगाव येथे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.

तसेच, लिलावात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त जे वाहन प्रशासकीय इमारत आवार किंवा इतर ठिकाणी जप्त आहेत व ज्या वाहनांचे क्रमांक किंवा चेसीस नंबर यात तफावत आहे अशाप्रकारच्या वाहनांना भंगार मध्ये देऊन दंडात्मक रकमेची वसुली केली जाईल याची सर्व वाहन चालक (वाहनमालक यांनी नोंद घ्यावी, असेही तहसीलदार शितल राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now