⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

बाजारपेठ, लग्नसमारंभमधील गर्दीवर आता मनपाच्या पथकांचे लक्ष, चार पथक नियुक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । ओमायक्रॉन या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली. त्यानंतर आता मनपा प्रशासनाकडूनदेखील तयारी सुरु केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, लग्नसमारंभ मधील गर्दीवर आता मनपाच्या पथकांचे लक्ष राहणार आहे. यासाठी ३२ कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या पथकांमध्ये एकूण ३२ जणांचा समावेश आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या पथकांमार्फत शहरातील सार्वजनिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जाणार आहे.या सोबतच शहरातील मुख्य बाजारपेठेसह महात्मा फुले व गोलाणी मार्केट सारख्या मोठ्या आणि गर्दीच्या मार्केटमधील दुकानांकडे ही मनपाचे लक्ष राहणार आहे.

चार पथकांकडून सातत्याने तपासणी

१) विविध आस्थापना व दुकानांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले की नाही याची खात्री केली जाणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात चार पथकांकडून सातत्याने पडताळणी केली जाणार आहे.

लग्न सोहळ्यात शंभरपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी आढळल्यास सर्वात आधी व्हिडिओ चित्रण केले जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना दंडासह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हे देखील वाचा :