जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । शहरातील एका भरवस्तीत दरोड्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दि. १२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रिद्धी अशोक जैन (वय २७, रा.जिल्हा पेठ परिसर) हे दि. १२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान, टीव्ही पाहत असताना एक अनोळखी भामटा व त्याचे ५ साथीदाराने घरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला. व फिर्यादीस मारहाण केली, तसेच त्याच्या आईला खाली ओढून जमिनीवर पडले, गळा दाबला. या प्रकरणी जैन यांनी दि.१३ रोजी जळ पेठ पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार भादवी ३९९,३२४ प्रमाणे अनोळखी सहा भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोउपनिरी. तपास गणेश देशमुख करीत आहे.