---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

---Advertisement---

Crime News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दोन शाळकरी विद्यार्थिनी लघवीसाठी मुतारीत गेल्या असता एका नराधमाने दोघींना गाठले होते. एकीने चावा घेत पळ काढला तर दुसरी त्याच्या तावडीत सापडली. नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता तिने देखील पळ काढल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. मेहुणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशाल उर्फ डिगंबर अशोक जाधव (कोळी) वय-२० रा.दहिवद ता.चाळीसगाव असे आरोपीचे नाव आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश व अति. सत्र न्या.बी.एस.महाजन यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

court jpg webp

अल्पवयीन पिडीता दि. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी दुपारी ०३.०० वाजेच्या सुमारास दहिवद येथील माध्यमिक विद्यालयातील मुतारीमध्ये लघवीसाठी गेल्या असता आरोपी नामे विशाल उर्फ डिगंबर अशोक जाधव (कोळी). वय – २० वर्षे, रा. दहिवद, ता. चाळीसगांव, जि. जळगांव याने मुतारीत जावून दोन्ही पिडीतांचे हात धरले. एकीने त्याच्या हातास चावा घेवून तिची सुटका करून घेतली. परंतू, दुस-या पिडीतेवर त्याने बलात्काराचा प्रयत्न केला असता, सुटका करुन पळून गेलेली पिडीता शाळेतील शिक्षकांना घेवून तेथे आली व सदर पिडीतेचेही सुटका केली. त्यामुळे बलात्काराचा गंभीर गुन्हा घडला नाही. म्हणून पिडीतेच्या आजोबांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आरोपीविरुद तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द गु.र. क. भा.दं.वि. कलम ३५४, ३७६ सह ५११ तसेच पोक्सोचे कलम ८ व १२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

---Advertisement---

सदर गुन्हयाचे काम तपास अधिकारी जे. आर. सातव, सहा. पोलीस मेहुणबारे यांनी गुन्हयाचा तपास काम करुन मे. न्यायालयात दोषारोपपत्र निरीक्षक दाखल केले. सदरचा खटला हा मे. विशेष मे. विशेष पोक्सो न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालला. सदर खटल्याच्या कामी सरकारपक्षातर्फे एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात दोन्ही पिडीता व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजेच शाळेतील शिक्षक यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहीले. तसेच आरोपीतर्फे ऍड. संदिप पाटील यांनी कामकाज पाहिले व पेहरवी अधिकारी विजय पाटील यांनी सरकारपक्षास सहकार्य केले. मे. न्यायालयाने सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांचा प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी यास दोषी धरुन खालील प्रमाणे शिक्षा सुनावली.

या प्रकारे दंड ठोठावला
भा.द.वि. कलम ३७६ सह ५११ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व रुपये ५,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ महीने सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३५४ अ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व रुपये १,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ आठवडा सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३५४ – ब अन्वये चार वर्षे सश्रम कारावास व रुपये ४,०००/- द्रव्य दंड न भरल्यास ३ आठवडे सश्रम कारावास, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व रुपये ३,०००/- द्रव्य दंड न भरल्यास २ आठवडे सश्रम कारावास, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व रुपये ५,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---