Jalgaon : ज्वेलर्स दुकानातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न ; चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद

डिसेंबर 1, 2023 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना प्रचंड वाढल्याचे दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच आता जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी न खुलल्याने चोरट्याने चांदीचे काही तुकडे घेऊन सीसीटीव्हीच्या वायरी कापून पलायन केलं. मात्र चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

jewelers shop in Jalgaon jpg webp

नेमका प्रकार काय
जळगाव शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग समजल्या जाणाऱ्या नवीपेठ भागात हेमंत रुंगठा, त्रिलोक रुंगठा यांचे १९५८ पासून असलेले जुने लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाने दुकान असून या दुकानात दागिने घडविण्याचे काम केले जाते. गुरुवारी नेहमी प्रमाणे हेमंत रुंगठा रात्री साडे दहा वाजे पर्यंत उपस्थित होता. त्याने दुकान बंद केल्यानंतर १ वाजून ५३ मिनिटाला एक चोरटा हा दुकानात आला . त्याने दुकानाची पट्टी तोडून आत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिजोरी या चोरट्याकडून न खुलल्याने त्याने चांदीचे काही तुकडे घेऊन सीसीटीव्हीच्या वायरी कापून पलायन केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान या घटने बाबत उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेशिवाय इतर नामांकित खासगी बँका असल्याने आणि या गल्लीत नामांकित प्रतिष्ठाने असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांसह श्वान पथकाने भेट दिली असता श्वानाने टॉवर पर्यंत रस्ता दाखविला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now