जळगावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न

मार्च 9, 2022 5:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील प्रेम नगर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाचे मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ही प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

miscreants loot tata indicash atm in bhadrak (1)

शहरातील बजरंग बोगद्याजवळ आणि पिंप्राळा रोडवरील प्रेम नगर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्यरात्री अडीचे ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरट्यांनी सुरूवातीला एटीएमच्या बाहेरचा आतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेने काळा रंग मारला. त्यानंतर दगडाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन न फुटल्याने चोरट्यांना रिकामे हाती परतावे लागले.

हा प्रकार सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रेमनगरातील नागरीकांच्या लक्षात आला. त्यावेळी काही सुज्ञ नागरीकांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now