अट्टल दुचाकी चोरटा गजाआड, २७ दुचाकी हस्तगत!

जुलै 28, 2022 9:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चोरट्याला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल बुधवारी दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संशयितावर जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

jalgaon crime jpg webp

योगेश शिवाजी दाभाडे रा. बळसाने ता.साक्री जि.धुळे असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. बुधवार, दि. २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धुळ्यातून संशय आरोपी योगेश शिवाजी दाभाडे याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पारोळा शहरातून चोरून नेली दुचाकीचा गुन्हा कबूल केला आहे. यापूर्वी देखील पारोळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संशयिताने दुचाकी चोरी केली होती. या गुन्ह्यात तो फरार होता.

त्याचप्रमाणे त्याच्यावर जळगाव शहर, पारोळा, अमळनेरसह धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या संशयित आरोपीकडून तब्बल २७ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला पारोळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now