---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र

आता प्रवाशांना रेल्वेतही एटीएम सुविधा मिळणार ; भुसावळ विभागाने सुरू केली सुविधा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । भारतात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून अनेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. यामुळे रेल्वेकडून प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपब्लध केल्या जात आहे. यातच आता रेल्वे प्रशासनाने धावत्या रेल्वे गाडीत एटीएम सुविधा सुरू केली आहे.

atm train

मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. अनेक वेळेस प्रवाशांना पैशाची निकड भासत असते. अशा परिस्थितीत रेल्वेतच प्रवाशांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे. यामुळे प्रवाशांसाठी हि सुविधा सोयीची ठरणार आहे.

---Advertisement---

दरम्यान एक्सप्रेसमध्ये एटीएमची हि सुविधा सुरु करण्यात येत आहे. एका बोगीच्या रिकाम्या जागेमध्ये हे एटीएम उभारण्यात आले आहे. हे मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला शटर देखील लावण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवासात ज्याला पैशांची गरज आहे, तो रक्कम काढू शकले. असे असले तरी एटीएम सुरक्षेचा प्रश्न मात्र येथे राहणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment