---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य

Gold Silver Today ! जळगावात सोने दरात घसरण, चांदी पुन्हा महागली; आताचे दर पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने लागू केलेल्या टेरिफ धोरणाचे पडसाद सुरूच असून एकीकडे काल मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली. तर दुसरीकडे जळगावच्या सराफा बाजारात सोने दरात घसरण दिसून आली. सोने दरात प्रति तोळा ५०० रुपयाची घसरण झाली; परंतु चांदी दारात प्रति किलो १ हजार रुपयाची वाढ दिसून आली. Gold Rate Today

gold silver jpg webp

गेल्या शुक्रवारपासून प्रतितोळा ९३,८०० रुपये दरावर असलेले सोने सोमवारीही स्थिर होते पण, मंगळवारी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ते ९३,३०० रुपये तोळ्यावर घसरले. दुसरीकडे चांदीही शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस ९५ हजार रुपये किलोवर स्थिरावली होती. सोमवारी बाजाराच्या पहिल्या दिवशी त्यात १ हजारांची वाढ झाली. तेजी कायम राखत मंगळवारी पुन्हा १ हजाराने वाढून ९७ रुपयांवर पोहोचली आहे.

---Advertisement---

आठवडाभरात सोने ३७०० चांदी ६ हजाराने महागली:
गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याचे दर ८९६०० रुपये तोळा होते. ते या मंगळवारी ९३,३०० वर पोहोचल्याने आठवडाभरात सोन्यात ३७०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. तर ९१ हजार रुपये किलो असलेली चांदी मंगळवारी ९७ हजारांवर पोहोचल्याने ६ हजाराने महागली आहे.

सोनं एक लाखांचा टप्पा पार करणार?
दरम्यान, सोने खरेदी विक्री क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर १ लाख रुपयांवर जाऊ शकतात. तर या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा तोळा १ लाख ३६ हजारपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आल्याने खरेदीकरांमध्ये खळबळ उडाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment