जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । हुंड्याच्या पैशांसाठी मानसिक, शिवीगाळ करत दारूच्या नशेत विवाहितेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलझाला आहे.
शहरातील रायासोनी नगरातील माहेर असलेल्या आश्विनी विशाल पाटील (वय २६) यांच्या विवाह भुसावळ येथील विशाल मधूकर पाटील यांच्याशी रितीरिवाजानूसार झाला. लग्नाच्या काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला हुंड्याच्या पैशांसाठी शिवीगाळ व गांजपाठ करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर पती विशाल पाटील हा दारू पिऊन येत मारहाण देखील केले. दरम्यान, विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासू, नणंद, नंदोई यांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव माहेरी निघून आल्या. शनिवार ११ जून रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पती विशाल मधूकर पाटील, सासू कोकाळाबाई मधूकर पाटील दोन्ही रा. भुसावळ, नणंद प्रिया अर्जून चौधरी, नंदोई अर्जून राजाराम चौधरी दोन्ही रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहे.