⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आषाढीची वारी : भुसावळात पाहायला मिळाले भाजप विरुद्ध भाजप चित्र

जळगाव लाईव्ह न्यूज । BJP vs. BJP । आषाढी वारीच्या निमित्ताने भुसावळ मध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पाहायला मिळाला. कारण खासदार उन्मेश पाटील यांच्या पोस्टरवर खासदार रक्षा खडसे यांचे पोस्टर खडसे समर्थकांनी लावले. (BJP vs. BJP)

आषाढी एकादशी निमित्त भुसावळ वरून पंढरपूर येथे खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेश पाटील यांनी विशेष रेल्वेगाडी चे आयोजन केले होते. या रेल्वेगाडीमध्ये बसून भाविकांनी पंढरपूर गाठले मात्र गाडीवर खासदार विरुद्ध खासदार म्हणजेच भाजपा विरुद्ध भाजपा असे पोस्टर वॉर रंगताना दिसले. या गाडीबाबत कोण श्रेय घेणार हे ठरवण्यासाठी हे पोस्टर वॉर झाल्याचे म्हटले जात आहे.

खासदार रक्षा खडसे यांच्या समर्थकांनी खासदार उन्मेश पाटील यांनी लावलेल्या पोस्टरवरच खडसे यांचे पोस्टर चिटकवल्याने उन्मेश पाटील यांचा चेहराच गाडीवरून गायब झाला होता. आषाढी एकादशी तब्बल दोन वर्षांनी कोरोना मुक्त परिस्थितीत निर्विघ्नपणे पार पडली. यावेळी वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पंढरपूर गाठले. मात्र स्वतःहून उन्मेश पाटील व रक्षा खडसे या दोघांनी ज्या विशेष गाडीचे नियोजन केले होते या गाडीवर भाजपा विरुद्ध भाजपा असे पोस्टर वॉर पाहायला मिळाले.

दरवर्षी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर गाठतात. विठू माऊली चे दर्शन घेण्यासाठी वारकरी चांगलेच उत्सुक असतात. यासाठी खासदारांनी विशेष ट्रेनचे आयोजन केले होते. मात्र यावेळी या ट्रेनचे श्रेय कोण घेणार यावरूनच दोघांमध्ये चांगलंच पोस्टर वॉर पाहायला मिळालं. रक्षा खडसे यांनी लावलेल्या पोस्टरवर उन्मेष पाटील यांचा फोटो होता. मात्र उन्मेश पाटलांच्या पोस्टरवर रक्षा खडसे यांचा फोटो नसल्याने त्यांचा फोटो खडसे समर्थकांनी झाकून टाकण्याचा प्रयत्न यावेळी केला.