आषाढीला पांडुरंगाच्या भेटीला जाताय! भुसावळ, जळगाव मार्गे धावणार पंढरपूरसाठी विशेष गाड्या

जून 14, 2025 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२५ । आषाढी एकादशीनिमित्त विठोबाचे देर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरपूरला जातात. याच पार्श्वभूमीवर यात्रेकरूंना अधिक सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये १ जुलै ते १० जुलै २०२५ या कालावधीत विविध मार्गांवरून ‘आषाढी विशेष गाड्या’ धावणार आहेत. यात भुसावळ आणि जळगाव मार्गे देखील काही विशेष गाड्या धावणार असून यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांची सोय होणार आहे.

pandharpur special train

विशेष गाड्यांचा तपशील असा…

न्यू अमरावती – पंढरपूर विशेष गाड्या (४ फेऱ्या)
गाडी क्र. 01119: न्यू अमरावतीहून प्रस्थान – १४:४० (०२ व ०५ जुलै), पंढरपूर आगमन – दुसऱ्या दिवशी ०९:१०.
गाडी क्र. 01120: पंढरपूरहून प्रस्थान – १९:३० (०३ व ०६ जुलै), न्यू अमरावती आगमन – दुसऱ्या दिवशी १२:५०.
थांबे: अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, इ.
रचना: पूर्ववत.

खामगाव – पंढरपूर विशेष गाड्या (४ फेऱ्या)
गाडी क्र. 01121: खामगावहून प्रस्थान – ११:३० (०३ व ०६ जुलै), पंढरपूर आगमन – दुसऱ्या दिवशी ०३:३०.
गाडी क्र. 01122: पंढरपूरहून प्रस्थान – ०५:०० (०४ व ०७ जुलै), खामगाव आगमन – १९:३०.
थांबे: भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, इ.
रचना: पूर्ववत.

नागपूर – मिरज विशेष गाड्या (४ फेऱ्या)
गाडी क्र. 01205: नागपूरहून प्रस्थान – ०८:५० (०४ व ०५ जुलै), मिरज आगमन – दुसऱ्या दिवशी ११:५५.
गाडी क्र. 01206: मिरजहून प्रस्थान – १२:५५ (०५ व ०६ जुलै), नागपूर आगमन – दुसऱ्या दिवशी १२:२५.
थांबे: अजनी, वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, पंढरपूर, इ.
रचना: २ एसी-३ टियर, १० स्लीपर, ४ सामान्य व २ सामानवाहू डबे.

भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (२ फेऱ्या)
गाडी क्र. 01159: भुसावळहून प्रस्थान – १३:३० (०५ जुलै), पंढरपूर आगमन – दुसऱ्या दिवशी ०३:३०.
गाडी क्र. 01160: पंढरपूरहून प्रस्थान – २२:३० (०६ जुलै), भुसावळ आगमन – दुसऱ्या दिवशी १३:००.
थांबे: जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, इ.
रचना: १६ सामान्य डबे व २ सामानवाहू डबे.

आरक्षण व तिकीटाबाबत सविस्तर माहिती अशी…
विशेष गाड्यांचे आरक्षण (गाड्या क्र. 01205, 01206, 01119, 01120, 01121, 01122) १६ जून २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in वर सुरू होईल. अनारक्षित तिकिटे UTS मोबाईल अ‍ॅप किंवा स्थानिक काऊंटरवर सुपरफास्ट दराने उपलब्ध असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment