बातम्या

Aryan Khan Drugs Case : NCB ची आर्यन खानला क्लिन चीट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Aryan Khan Drugs Case । हिंदी सिने श्रुष्टीचा बादशहा अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला मुंबई ncb ने क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानला एनसीबीने मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.

एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं.

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे. आर्यन खान, अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल असा या ६ जणांची नावे आहेत.

Related Articles

Back to top button