‘त्या’ घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करा, अन्यथा..

सप्टेंबर 19, 2022 4:43 PM

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । निपाणे येथील बौद्ध समाजाच्या वयोवृध्द महिलेचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करणाऱ्या जातीयवादी गावगुंड यांच्यावर दाखल झालेल्या अट्रोसिटी ॲक्टसह इतर कलमा खाली गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करून कार्यवाही करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एरंडोल, तालुका शाखेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन कासोदा पोलिस निरीक्षक निता कायटे यांना देण्यात आले.

jalgoan 10 1

छत्रपती, शाहू, फुले आंबेडकरया विचारांच्या महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारच्या घटना घडणे ही बाब दुर्दैवी आहे. अशा या घटनेच्या सर्व समाज माध्यमातून जाहीर निषेध होत आहे. अशा खालच्या प्रवृत्तीच्या जातीयवाद्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करा करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एरंडोल शाखेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांनी दिला आहे. निवेदनावर महिंद्र मोरे ,जितेंद्र वाघ, मन्सूर पठाण, सतीश सोनवणे ,राहुल पान पाटील, अक्षय पान पाटील ,भाऊसाहेब पान पाटील ,अब्दुल कादर रयाजुद्दीन सलाउद्दीन ,शेख बिलाल ,विजय मोरे, शमशुद्दीन शेख नजबुद्दीन यावेळी उपस्थित होते.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now