गुन्हेजळगाव जिल्हाभुसावळ
‘त्या’ महिला प्रवाशाचा मोबाइल लांबवणाऱ्या भामट्याची अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाचा मोबाइल लांबवणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. मयूर उर्फ भैय्या संजू अंभोरे (वय २२) असे त्याचे नाव आहे.
समशेर अली मलिक (वय ६०, रा.मुंब्रा, जि.ठाणे) हे पत्नीसह १५ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई-नागपूर सेवा-ग्राम एक्स्प्रेसच्या एस-४ बोगीतून ठाणे ते अकोला असा प्रवास करत होते. भुसावळ स्थानक येण्यापूर्वी मयूर अंभोरे याने फिर्यादीच्या बर्थ जवळ येऊन कोणते स्थानक आले? अशी विचारणा केली. मलिक यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पत्नीच्या हातातील ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मयूर अंभोरेचा सहभाग असल्याचे धागेदोरे मिळताच अटक झाली.