जळगावच्या तरुणाचा अमेरिकेत मृत्यू..

जानेवारी 2, 2026 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या रामानंदनगर परिसरातील शास्त्रीनगरात राहणारा व सध्या अमेरिकेच्या हार्वर्ड येथे वास्तव्यास असलेला उणे तापमानात रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अर्णव सुबोध सराफ (वय २६, रा शास्त्रीनगर, जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

arnav saraf

जळगावच्या रामानंदनगर परिसरातील शास्त्रीनगर मधील राहणार अर्णव सराफ हा मूळजी जेठा महाविद्यालयातील प्रा. डॉ. शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचा धाकटा मुलगा आहे. अर्णव गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत हार्वर्ड येथे डाटा सायन्स विषयात एमएसचे शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी कुटुंबीयांना त्याच्या वसतिगृहातील सूत्रांनी घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे सराफ कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

निधनाची माहिती मिळताच सुबोध सराफ आणि शमा सराफ हे मुंबईहून अमेरिकेकडे रवाना झाले आहेत. अर्णववर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अर्णवच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

सराफ कुटुंब जळगावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून विविध उपक्रमांद्वारे त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. अर्णवच्या आकस्मिक निधनाची बातमी पसरताच रामानंद नगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी मोठ्या संख्येने भेट देत शोक व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now