⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | नोकरी संधी | आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी.. तब्बल 8700 जागा रिक्त

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी.. तब्बल 8700 जागा रिक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Army Public School Bharti 2022 : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये (AWES) विविध शिक्षक कर्मचारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार AWES च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 7 जानेवारी 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

येथे अर्ज करा
उमेदवार awesindia.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार वेबसाइटवर उपस्थित असलेल्या भरती अधिसूचना पाहून देखील माहिती मिळवू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे कॅन्टोन्मेंट आणि मिलिटरी स्टेशनमध्ये शिक्षकांच्या 137 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर एकूण 8000 पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या पदांची भरती OST द्वारे केली जाईल.

एकूण पदसंख्या :  8700 जागा

पदाचे नाव :
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयोमर्यादा-
40 वर्षांखालील फ्रेशर्स या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात. 57 वर्षांपेक्षा कमी वयाचे अनुभवी उमेदवार या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया (Army Public School Bharti 2022)
ऑनलाइन स्क्रीनिंग चाचणीनंतर मुलाखत घेतली जाईल, त्यानंतर अध्यापन कौशल्याचे मूल्यांकन केले जाईल. स्क्रीनिंग टेस्टमध्ये MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

या तारखा लक्षात ठेवा (Army Public School Recruitment 2022)

अर्ज प्रक्रिया- 7 जानेवारी 2022
नोंदणी प्रक्रिया अंतिम तारीख – 28 जानेवारी 2022
प्रवेशपत्राची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख – 19 आणि 20 फेब्रुवारी 2022
निकालाची तारीख – २८ फेब्रुवारी २०२२

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.