⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अवैध वाळू वाहतुकीवरून पुन्हा वाद, आव्हाण्यात दोन गट भिडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । आव्हाणे ग्रामपंचायतीसमोर स्टॉपवर एकमेकांची खुन्नस व उणेदुणे काढून सात ते आठ जण शिवीगाळ व हाणामारी करीत होते. या दोन्ही गटात यापूर्वी वाळू वाहतुकीवरून वाद उफाळून आले होते. या प्रकारामुळे गावात तणाव झाला. ही माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने आव्हाण्यात जाऊन नियंत्रण मिळवले.

अवैध वाहतूक संदर्भात दाखल गुन्हे, जुने वाद या कारणांवरून एकमेकांना खुन्नस दिल्याने आव्हाणे गावात दोन गट आपसात भिडले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गावाच्या बसस्थानकाजवळ ही घटना घडली. दोन्ही गटातून कोणीही फिर्याद देण्यासाठी न आल्याने अखेर पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस कर्मचारी वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून हाणामारी करणारे श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी, रावसाहेब गोपाल चौधरी, सागर गोपाल चौधरी, मनीष नरेंद्र पाटील, श्याम नरेंद्र पाटील, नरेंद्र पोपट पाटील, आकाश लहू पाटील, मंगल लहू पाटील या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. यापैकी श्रीराम चौधरी, रावसाहेब चौधरी, मनीष पाटील व नरेंद्र पाटील या चार जणांना अटक करण्यात आली. विजय दुसाने तपास करीत आहेत.

हे देखील वाचा: