⁠ 
बुधवार, मे 8, 2024

एरंडोल भूमि अभिलेख कार्यालयाचा मनमानी कारभर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथिल भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारने काम सुरु असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्रस्त नागरिकांमधून हे कार्यालय भगवानच्या भरोसे चालू आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

सविस्तर असे की, एरंडोल येथिल भूमि अभिलेख कार्यालयाच्या कारभराने तालुका वाशी त्रस्त झाले. असून कार्यालयात सकाळी १०:३० वाजेपर्यंत कार्यालयाला कुलूप असते. अगोदरच शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. त्यातच तेथील कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारची शिस्त नसल्याचे दिसून येते. सकाळाचेच नाही तर सायंकाळी देखील साडेचार वाजेनंतर कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी हजर नसतात. त्यामुळे कार्यालय भगवानच्या भरोसे चालू आहे की काय ? अशी चर्चा त्रस्त नागरिका मध्ये होत आहे. येथील कर्मचारी व अधिकारी त्यांना वेळ मिळेल त्यावेळी कामावर येतात की काय ? असाही सवाल ग्रामीण भागातून येणाऱ्यांना वाटू लागले आहे.

सदर प्रकाराकडे लोकप्रतिनिधीनि लक्ष घालून वेळेवर न येणारे जाणारे महाशयांवर कडक कार्यवाही करावी व कार्यालयात बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन लावावे व बाहेर साईडवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी सूचना लावावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा :