---Advertisement---
एरंडोल

एरंडोलला उद्या फेरफार अदालतीचे आयोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील एरंडोल, रिंगणगाव व कासोदा या मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता फेरफार अदालत घेण्यात येणार आहे. या दिवशी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडील ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज त्यादिवशी फेरफार अदालती मध्ये सादर करावे. सदर अर्जांवर फेरफार अदालतीमध्ये तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिली आहे.

jalgoan 23 jpg webp

एरंडोल तालुक्यातील ३७ हजार ४८३ शेतकऱ्यांपैकी ११हजार १९७ शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये पीक पेर्यांची नोंद केलेली असून अद्याप पावतो २६ हजार २८६ शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंद करावयाचे बाकी आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी करावयाची बाकी आहे. त्यांनी तात्काळ ई पीक पाहणी बाबत आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी वर्जन दोन हे ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकाची शेताच्या मध्यभागी जाऊन ई पीक पाहणी नोंदवावी अन्यथा जे शेतकरी मुदतीत ई पिक पाहण्याची नोंद करणार नाही असे शेतकरी हे बँकेकडून पीक कर्ज , शासनाकडून नुकसान भरपाई, फळपीक विमा योजनेचा लाभ इतर शेतकऱ्यांच्या शेत लाभांच्या योजना या सवलती पासून वंचित राहतील असे तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---