---Advertisement---
जळगाव जिल्हा

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशकांची नियुक्ती

exam
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. या परिक्षेच्या कालावधीत परीक्षेचा व अभ्यासाचा ताण आणि परीक्षेची भिती यामुळे विद्यार्थी दडपणाखाली येवून नकारात्मक विचार करतात व कधी-कधी टोकाची भुमिका घेतात.

exam

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व त्यांनी निकोप वातावरणात परीक्षा द्यावी म्हणून विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येत असते. विद्यार्थ्यांच्या ताण-तणाव विषयक समस्यांचे शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी व ताण-तणावामुळे विद्यार्थ्यांनी टोकाची भुमिका घेवू नये यासाठी समुपदेशनासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर खालील समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

---Advertisement---

ज्या विद्यार्थी / पालकांना काही ताण-तणाव / समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे ताण-तणाव/समस्या मांडल्यास त्यांना समुपदेशकांमार्फत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
नाशिक
किरण रामगीर बावा ९४२३१८४१४१
अरूण बंडू जायभावे ९६५७५०१७७३
धुळे
नंदकिशोर उध्दवराव बागुल ९४२०८५२५३१
लक्ष्मीकांत बापुराव २ पाटील ८६९८०१२७७७

जळगाव
दयानंद रघुनाथ महाजन ७७६८०८२१०५, ९३७०६१४९५९
किरण प्रकाश सनेर ९०२८९१०७८५, ९५४५०२५४५०
नंदुरबार
राजेंद्र सुकदेव माळी ९४०४७४९८००
अशोक भटा महाले ९४२१६१८१३

ही सुविधा दिनांक ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम.एस. देसले यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---