जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल? वाचा आकडेवारी

नोव्हेंबर 17, 2025 10:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२५ । जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी २२९ उमेदवारांनी तर सदस्यपदासाठी ३५४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

jalgaon election jpg webp

जिल्ह्यातील एकूण 19 नगरपरिषदांपैकी बोदवड येथे आधीच नगरपरिषद अस्तित्वात असल्यामुळे उर्वरित १८ ठिकाणी निवडणूक होणार आहे. शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या दोन नगरपंचायती आहेत. तर भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा या १६ नगर परिषदचा समावेश आहेत. यासाठी २ डिसेंबरला मतदान होईल. आणि ३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

दरम्यान, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवार अखेर सदस्यपदाच्या ४६४ जागांसाठी एकूण सुमारे ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर नगराध्यक्षांच्या १८ जागांसाठी एकूण २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. भुसावळमधील अखेरच्या दिवशी दाखल अर्जांची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही.दरम्यान, सोमवारी शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवसांत सदस्यपदासाठी १६७३ आणि नगराध्यक्षपदासाठी १२८ अर्ज दाखल करण्यात आले.

मंगळवारी दाखल झालेल्या सर्व अर्जांची ठिकठिकाणी छाननी होणार असून, शुक्रवारपर्यंत अपील नसेल तिथे संबंधितांना अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतर २६ तारखेला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यात अंतिम मतदार यादीनुसार, पुरूष मतदारांची संख्या सुमारे चार लाख ५० हजार ८९३ तसेच स्त्री मतदारांची संख्या चार लाख ३८ हजार ९३८ आणि इतर मतदारांची संख्या ८३ इतकी आहे. या अनुषंगाने ९७७ मतदान केंद्रे, १२९० कंट्रोल युनिट आणि २७४३ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४६४ सदस्यांसाठी निवडणूक होत असून, त्यात एक सदस्यीय प्रभाग ३४, दोन सदस्यीय प्रभाग २०६ आणि तीन सदस्यीय प्रभाग सहा असणार आहेत.

मतदारांना सहा ठिकाणी नगराध्यक्षांसह तीन सदस्यांच्या निवडीसाठी चार मते तसेच २०६ ठिकाणी नगराध्यक्षांसह दोन सदस्यांच्या निवडीसाठी तीन मते देण्याचा अधिकार असेल. एकूण ९७७ मतदान केंद्रांसाठी सुमारे पाच मनुष्यबळ प्रति केंद्र अशा प्रमाणात कर्मचारी नेमले जाणार आहेत. त्याच प्रमाणे २० टक्के अतिरिक्त राखीव मनुष्यबळ ठेवले आहे. ईव्हीएमची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे बारकोड स्कॅनिंगची प्रक्रिया देखील पूर्ण.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now