जळगाव जिल्हा
डीएपीऐवजी पर्यायी संयुक्त खतांचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात संयुक्त खते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी पर्यायी संयुक्त खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. त्यानुसार कृषी विभागाच्या आयुक्तालयाने १०.२६.२६, १२.३६.१६, २०.२०.०.१३ व १५.१५.१५ या संयुक्त व एसएसपी खताच्या डीएपी खतास पर्यायी खत म्हणून वापरास शिफारस केली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात संयुक्त खते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी डीएपी ऐवजी संयुक्त खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी केले आहे.