Sunday, August 14, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

एका शेअरमुळे जळगाव जिल्ह्यातील एक गाव झाले ७००० कोटींचे मालक ; जाणून रोचक इतिहास

चेतन वाणीbyचेतन वाणी
July 27, 2022 | 5:27 pm
7000cr

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा तसा जगभर काही निवडक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे केळी, कापूस, सोने. औद्योगिकदृष्ट्या जगाच्या पाठीवर जळगावचे नाव पोहचविण्यात मोठा वाटा असलेला उद्योग म्हणजे जैन उद्योग समूह. जळगावात तसे रिमांड, सुप्रीम, पारले, हिताची, स्पेक्ट्रम कंपनीचे देखील प्रकल्प आहेत परंतु जळगावचा असलेला एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे आजची ‘विप्रो’ (Wipro) कंपनी. १९५० च्या दशकात डालडा तुपाने मोठी क्रांती आणली. डालडाची स्थापना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर गावी केली ती अजीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद हुसेन हशन प्रेमजी यांनी. आजची विप्रो म्हणजेच तेव्हाच्या वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अमळनेरच्या कितीतरी नागरिकांना आज करोडपती केले आहे. विप्रोच्या सर्वसामान्य जनतेकडे असलेल्या १५.३७ टक्के शेअर्स पैकी ३ टक्के शेअर्स एकट्या अमळनेरमध्ये असून त्याची आजची किंमत तब्बल ७ हजार ६०० कोटी आहे.

जळगाव जिल्ह्यातील एक गाव करोडपतींचे गाव आहे असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वासच बसणार नाही परंतु हे खरे आहे. जळगाव जिल्ह्यातील आजचा एक प्रमुख तालुका असलेल्या अमळनेरच्या रस्त्यावरून चालत जाणारा एखादा सर्वसामान्य व्यक्ती देखील आज करोडपती आहे. आपण विचार करत असणार हे कसे शक्य आहे तर त्यासाठी आपल्याला १९५० च्या दशकात जावे लागेल. देशाच्या आणि जगाच्या पाठीवर गर्भश्रीमंतांच्या यादीत नाव असलेले व्यक्तिमत्व म्हणजे अजीम प्रेमजी. आज विप्रो कंपनीमुळे आपण अजीम प्रेमजी यांना ओळखतो. आजच्या विप्रोची स्थापना २९ डिसेंबर १९४५ मध्ये वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड या नावाने करण्यात आली होती.

अजीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद हुसेन हशम प्रेमजी हे बर्माचे प्रिन्स ऑफ राईज म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर प्रेमजी कुटुंब गुजरातच्या कच्छला आले. इंग्रजांच्या व्यापारी धोरणाला कंटाळून त्यांनी वनस्पती तूप म्हणजेच डालडा तयार करण्यास सुरुवात केली. २९ डिसेंबर १९४५ रोजी वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन अधिक होत असल्याने या कंपनीने अमळनेरमध्ये आपला भव्य प्रकल्प टाकण्याचा निर्णय घेतला आणि कंपनी सुरु झाली. स्थानिक नागरिकांना नोकरदार म्हणून प्राधान्य देण्यात आले. बघता बघता डालडा घराघरात पोहचले. पिवळ्या रंगाचे डबे आणि त्यावर निळ्या रंगाचे सूर्यफुलाचे चित्र असलेले डालडा तुपाचे डबे अनेक वर्ष भारतीयांच्या स्वयंपाक घरात आपली जागा पक्की करून होते.

भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचे प्रधानमंत्री मोहम्मद अली जिना यांनी मोहम्मद हुसेन प्रेमजी यांना पाकिस्तानात स्थायिक होण्यासाठी मोठे प्रयत्न केले आपले जोरदार प्रयत्न करीत त्यांनी प्रचंड आग्रह केला इतकंच नव्हे तर असे म्हणतात कि जिना यांनी प्रेमजी यांना पाकिस्तानचे अर्थमंत्री पद देखील देऊ केले परंतु प्रेमजी यांनी नकार दिला. अमळनेरच्या डालडा कंपनीकडून तेव्हाच्या काळात कंपनीचे काही शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणण्यात आले होते. एका शेअरची किंमत १०० रुपये होते. त्याकाळी १०० रुपये देखील खूप होते. प्रेमजी यांनी शेअर्सच्या विक्रीसाठी जोरदार मार्केटिंग केल्याची देखील माहिती आहे. कंपनीतच काम करणाऱ्या कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना प्रेमजी यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, मुलींच्या लग्नासाठी शेअर घेण्याचे त्यांनी सांगितले.

डालडा तुपासोबत कंपनीने साबण आणि त्याच्याशी निगडित इतर उत्पादने निर्मिती सुरु केली. कंपनी फायद्यात असल्याचे पाहून गुंतवणूकदार देखील वाढले. तेव्हापासून समभागधारक म्हणजेच शेअर होल्डरर्सला दरवर्षी चांगला लाभांश दिला जात होता. एका ऐकीव माहितीनुसार १९८० मध्ये एका व्यक्तीने २ लाख रुपयांचे शेअर्स घेतले होते. आज त्याच्या शेअर्सची किंमत ५०० कोटी आहे. ते सांगतात कि मी केवळ शेअर्सच्या लाभांशवर मुलांचे शिक्षण आणि लग्न पूर्ण केले. अमळनेरच्या अनेकांना तर आपल्या नावे शेअर्स असल्याचे माहितीच नव्हते. वडिलांनी केलेली गुंतवणूक आपसूकच त्यांच्यानंतर मुलांना मिळाली. आज ती मुले करोडपती आहेत. विप्रो च्या जनतेत असलेल्या शेअर्सपैकी ३ टक्के शेअर्स अमळनेरमध्ये असल्याचे म्हटले जाते. आज त्या तीन टक्के शेअर्सची रक्कम अंदाजे ७ हजार ६०० कोटी होते.

मोहम्मद हुसेन हशम प्रेमजी यांचा मुलगा म्हणजेच अजीम प्रेमजी हे कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी गेलेले होते. प्रेमजी परिवाराच्या आयुष्यात ११ ऑगस्ट १९६६ रोजी सर्वांना थांबविणारी घटना घडली. मोहम्मद हुसेन प्रेमजी हे जग सोडून गेले. अजीम प्रेमजी तेव्हा अवघे २१ वर्षांचे होते. भारतात आल्यानंतर त्यांनी लागलीच कंपनीची सूत्रे हाती घेतली. भारतातील लालफितीमुळे आणि तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता तेव्हा आयबीएमने देशातील गाशा गुंडाळला होता. नेमक्या याच संधीचा फायदा घेण्याचे नियोजन अजीम प्रेमजी यांनी केले. कंपनीच्या वेस्टर्न इंडिया व्हेजीटेबल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावातून त्यांनी व्हेजीटेबल हे हटवून वेस्टर्न इंडिया प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड असे केले. पुढे चालून व्हेजीटेबलमधील W डब्ल्यू आणि प्रॉडक्ट्समधील PRO असे WIPRO विप्रो तयार झाले. विप्रो कंपनीने इतर क्षेत्रात आणि विशेषतः आयटी क्षेत्रात चांगला पाया रचला. आज देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर विप्रोचे नाव आहे. २००२ मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये विप्रो कंपनी लिस्टेड झाली.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in विशेष, अमळनेर, जळगाव जिल्हा, राष्ट्रीय, वाणिज्य
Tags: amalnerWipro
SendShareTweet
चेतन वाणी

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
Solar panel

'या' शासकीय योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्या, २४ तास मोफत वीज मिळेल; बिलही येणार नाही

shinde sarkar baithak

आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले 8 मोठे निर्णय

eknath shinde and devendra fadanvis

शिंदे सरकार : वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मोठा दिलासा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group