⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | विधानसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागातर्फे जनतेला आवाहन

विधानसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागातर्फे जनतेला आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांनी आपल्या मतदार संघातील निवडणूकीसाठी अर्ज जमा केले आहे.उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र निवडणुकीवेळी पैशांचे अनेक गैरव्यवहार घडत असतात.

त्यामुळे निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असेल तर लवकरात लवकर प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप आयकर निदेशक अनिल खडसे यांनी केले आहे. एक परिपत्रक प्रसिद्ध करत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाशी सहकार्य करावे असे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे.

या निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती देण्यास संकोच करू नये अशी विनंती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. जर कुणाला याबाबत माहिती द्यावयची असेल तर त्यांनी टोल फ्री नंबर : 1800-233-0355, व्हॉट्सअॅप क्रमांक : 9403390980 (छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी पाठविण्यासाठी) किंवा [email protected], [email protected] या ईमेल वर मेल करावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.