---Advertisement---
एरंडोल

पदवीधर मतदारांना तहसीलदारांचे आवाहन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील एरंडोल तालुक्यातील पदवीधर असणाऱ्या मतदारांची मतदार नोंदणी १ऑक्टोंबर पासून सुरू झाली असून ७ नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणीचे काम सुरू राहणार आहे. पदवीधर मतदारांनी पदवी धारण केल्याचे साक्षांकित पत्र जोडून नोंदणीसाठी लागणारा नमुना क्रमांक १८ भरून ७ नोव्हेंबर पर्यंत संबंधित मंडळाधिकारी यांच्याकडे जमा करावा असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले आहे

jalgaon 2022 10 15T162954.235 jpg webp

आपल्या मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी सर्व पदवीधारक यांनी मतदार नोंदणीसाठी लागणारा नमुना क्रमांक १८ हा आपल्या तालुक्यातील एरंडोल,कासोदा, उत्राण व रिंगणगाव या चार मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून तसेच शहरी भागातील पदवीधर मतदारांनी नगरपालिकेमधून प्राप्त करून घेऊन सोबत पदवी धारण केल्याचे साक्षांकित प्रमाणपत्र जोडावे असे प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---