जळगाव जिल्हायावल

जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल; रामानंदनगरचे API संदीप पाटील आता फैजपूरचे प्रभारी अधिकारी!

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत. या अंतर्गत फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहायक पोलीस निरीक्षक (API) संदीप रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त प्रभारी अधिकारी एपीआय संदीप पाटील हे सध्या जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तिथून आता त्यांची बदली फैजपूर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. एपीआय संदीप पाटील यांना पोलीस प्रशासनातील कामाचा दांडगा अनुभव असून, त्यांनी यापूर्वी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या अनुभवामुळे फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीला चाप बसण्यास आणि कामकाजाला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ते लवकरच आपल्या नवीन पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारणार आहेत.

जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केवळ फैजपूरच नव्हे, तर जिल्ह्यातील अन्य काही पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले आहेत. या एकाच वेळी झालेल्या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत व्हावी, गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे आणि नागरिकांना तात्काळ न्याय मिळावा, याच उद्देशाने हे प्रशासकीय बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button