नशिराबाद येथून ॲपे रिक्षा लांबविली ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

सप्टेंबर 26, 2021 3:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । नशिराबाद येथून बस स्थानकासमोर पार्किंगला लावलेली प्रवाशी ॲपे रिक्षा अज्ञात चोरट्यांने लांबविली. याप्रकरणी  रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल सुभाष अडकमोल (वय-२४) रा. नशिराबाद बसस्थानकाच्या मागे हा आपल्या कुटुंबीयांसह राहतो. त्यांच्याकडे (एमएच १९ सीडब्ल्यू २२९८) क्रमांकाची ॲपे रिक्षा आहे. १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १८ सप्टेंबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान बसस्थानकाजवळ लावलेली दीड लाख रुपये किमतीची ॲपे रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु रिक्षा आढळून आली नाही.

अखेर २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलिस ठाण्यात निखिल अडकमोल यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात ॲपे रिक्षा चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुलाब माडी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now