प्रफुल्ल लोढाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार

जुलै 22, 2025 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असून या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

prafull lodha

पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ३६ वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत प्रफुल्ल लोढा यांनी तिच्यावर बलात्कार केला. प्रफुल्ल लोढा यांनी या महिलेला बालेवाडीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला. याआधी प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात आधीत दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे प्रफुल्ल लोढाचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

पीडित महिलेने प्रफुल्ल लोढा यांना विरोध केल्यानंतर त्यांनी तिची सुद्धा नोकरी घालवण्याची धमकी दिली आणि तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असे या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या तक्रारीची दखल घेत बावधन पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ६४ (१) आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ‘प्रफुल्ल लोढा यांनी मला माझ्या नवऱ्याला नोकरी लावून देतो असे सांगितले होते. याच बहाण्याने त्यांनी मला २७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी मला तुझ्या नवऱ्याला नोकरी लावायची असेल तर त्या बदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवू दे, अशी मागणी केली. मी याला विरोध केला. त्यावेळी लोढा यांनी मला तुझीही नोकरी घालवेन अशी धमकी दिली. यानंतर माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.’

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now