⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महागाईचा आणखी एक झटका ; आता चिकनसाठीही मोजावे लागणार अधिक पैसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चिकनचे दर वाढले आहेत. कोरोना काळात मागणी जास्त असल्याने दर वाढले होते. ते आता पुन्हा वाढले आहेत. आताच कारण आहे कमी उत्पादन आणि जास्त मागणी.गेल्या काही दिवसांपासून सर्वच ठिकाणी भाव वाढ झाली आहे. आता चिकनचे भाव वाढल्याने आता नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे.


चिकनच्या किंमती का वाढत आहेत?

पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांच्या माहितीनुसार कोंबडी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची किंमत गेल्या महिन्यात 30 ते 40 रुपयांवर होती. ती आता 60 रुपयांच्या वर गेली आहे. याच बरोबर जिल्हात वाढलेल्या उकाढ्यामुळे कोंबड्या वहातुकीवली मरत आहेत. यामुळे आत्ता उत्पादन कमी झालं असून मागणी वाढली आहे.


चिकन 240 रुपयांपर्यंत

जिल्हात मार्च महिन्यापूर्वी चिकन २०० रुपये किलो पर्यंत मिळत होते. आता तेच चिकन २४० ते २६० रुपयांनी मिळत आहे.