गुन्हेयावल

गळफास घेऊन मजुराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे एका मजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. किरण अशोक सरोदे (वय ३९) असे मृताचे नाव असून त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

crime jpg webp

किरण सरोदे हा आपल्या सहा वर्षीय मुलासह गावात राहत होता. हात मजुरी करून ताे उदरनिर्वाह करत होता. रविवारी सायंकाळी किरण सरोदे याचा मुलगा देवांग हा घराबाहेर रडत असल्याचे पाहून नागरिकांनी त्यास विचारले असता वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे नागरिकांनी तातडीने त्याच्या घराकडे धाव घेतली.

तसेच येथील पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने किरण सरोदे यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी अनिल सरोदे यांनी दिलेल्या खबरी वरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास अशोक जवरे करत असून मृत किरण सरोदे यांच्यावर सोमवारी सकाळी १० वाजता सांगवी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button